
नागपूर : वादग्रस्त मंत्र्यांना काढायचे की ठेवायचे हा मुख्यमंत्र्यांचा चॉईस आहे. खांदेपालट करणे म्हणजे मंत्री जे बोलले त्यास मान्यता देणे असा अर्थ होईल. असे असले तरी खांदेपालट केले किंवा खात्यांची अदलाबदली केली तरी स्वभाव बदलत नाही, असा टोला हाणत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला लक्ष केले.