
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी (ता.२४) रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पाटील यांनी तासभर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले तर सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांसाठी बावनकुळेंची भेट घेतल्याचा खुलासा पाटील यांनी ‘एक्स’वरुन केला.