

Rajmata Jijau Jayanti: Sea of Devotees Witness Historic Celebrations
Sakal
-गजानन काळुसे
सिंदखेड राजा : मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी ४२८ वा माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा भव्य पद्धतीने साजरा होणार आहे. त्यासाठी प्रशासन व मातृतीर्थ सज्ज झाले आहे. राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊ जन्मस्थळी सूर्योदयापूर्वी महापूजन विधिवत पद्धतीने संपन्न होणार आहे. यानंतर नागरिकांसाठी जिजाऊ जन्मस्थळ दर्शनासाठी खुले होईल.