Nagpur Politics: नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मतदार याद्यांतील घोळावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वतःहून जनहित याचिका दाखल करावी, अशी मागणी केली. त्यांनी निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनल्याचा आरोप करून लोकशाही धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली.
नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवडणूक आयोगाच्या घोळाची दखल घेऊन स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे व्यक्त केली.