Rescue operation underway after a labourers’ vehicle met with an accident.
sakal
पोंभुर्णा: तेलंगणा राज्यात रोवणीच्या कामासाठी गेलेल्या मजूर महिलांना घेऊन परत येत असलेल्या पिकअप बोलेरो वाहनाचा मंगळवार (ता. २१) पहाटे साडेपाचच्या सुमारास नांदगाव येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. २२ मजूर जखमी झाले आहेत. मृतांत वनिता भिकाजी मरस्कोल्हे (वय ३८ रा. डोंगरहळदी ता. पोंभुर्णा), हरिदास विलास मीटपल्लीवार (वय ४३ रा. नांदगाव, ता. मूल) यांचा समावेश आहे.