esakal | पानठेला सांभाळून चालवायची "ती' अख्खा संसाराचा गाडा, मग का उचलले तिने असे पाऊल ?...
sakal

बोलून बातमी शोधा

file

नरखेड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आग्रा येथे सुरेखा प्रदीप बागडे (35) व प्रदीप उमाजी बागडे (40) हे दाम्पत्य पानठेल्याचा व्यवसाय करून आयुष्याचा गाळा हाकीत होते. या पानठेल्याच्या भरवशावर कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. सर्व सुरळीत सुरू असताना मात्र, मध्येच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले.

पानठेला सांभाळून चालवायची "ती' अख्खा संसाराचा गाडा, मग का उचलले तिने असे पाऊल ?...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि.नागपूर)  : तिच्या असण्याने जगण्याला किंमत येते. तिच्या हसण्याने अख्खे घर खुशीत येते. तिच्या हसण्या-रडण्यावरच चार भिंतीत चैतन्य सामावते, असे जरी असले तरी तिच्यावर येणारा आर्थिक ताण व त्यामुळे काही करू शकत नसल्याच्या जाणिवेतून तिच्यात आलेले नैराश्‍य तिला असहय ठरत असावे कदाचित ! लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद असल्याने अनेक व्यवसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे नरखेड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आग्रा येथील पानठेलाचालक महिलेने अगतिक होउन मृत्यूला कवटाळले. अखेर महिलेने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

हेही वाचा  :  रमजानच्या पवित्र महिन्यात ते करतात कोरोना रूग्णांची सेवा

सुरळीत चालत होता आयुष्याचा गाढा
नरखेड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आग्रा येथे सुरेखा प्रदीप बागडे (35) व प्रदीप उमाजी बागडे (40) हे दाम्पत्य पानठेल्याचा व्यवसाय करून आयुष्याचा गाळा हाकीत होते. या पानठेल्याच्या भरवशावर कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. सर्व सुरळीत सुरू असताना मात्र, मध्येच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. ज्या व्यवसायच्या भरवशायावर रात्रीची चूल पेटायची, तोच बंद झाल्याने बागडे कुटुंब आर्थिक अडचणीत आले. दोन महिन्यांपासून काहीच व्यवसाय नसल्याने थोडीफार असलेली बचत खर्च झाली. काही प्रमाणात उसणवारी करून घर चालविले; परंतु वाढता लॉकडाउन व त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यामुळे सुरेखा हिने कुणाला माहित न होता वेगळाच निर्णय घेतला.

हेही वाचा  :  वाघिणीच्या हल्ल्यात बेसूरचे दोघे जखमी, बछडयांसह दबा धरून बसली होती शेतात

विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा
शुक्रवारी रात्री साडेअकराला आग्रा शिवारातील विहिरीत उडी घेऊन तिने जीवनयात्रा संपविली. दुसऱ्या दिवशी पती प्रदीपने तिचा शोध घेतला असता, ती घरी व शेजारीही दिसून न आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने तिचा शोध घेतला. तिचा मृतदेह गावाशेजारी शिवारात असलेल्या विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती नरखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. 

loading image
go to top