मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी न्यायमूर्ती दत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Justice Datta

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे 55 वर्षांचे आहेत. ते मागील सुमारे 14 वर्षांपासून कलकत्ता उच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचे काम करीत आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिवंगत सलीलकुमार दत्ता यांचे ते चिरंजीव आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अमिताव रॉय यांचे मेहुणे आहेत. 1989 मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी न्यायमूर्ती दत्ता

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केल्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं नुकतीच त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे 55 वर्षांचे आहेत. ते मागील सुमारे 14 वर्षांपासून कलकत्ता उच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचे काम करीत आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिवंगत सलीलकुमार दत्ता यांचे ते चिरंजीव आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अमिताव रॉय यांचे मेहुणे आहेत. 1989 मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली.
मुख्यत्वे, कलकत्ता उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वकिली केली.

सविस्तर वाचा - चौघे परिचारिकेच्या खोलीत शिरले अन पैशाची मागणी करीत केले हे कृत्य

त्याशिवाय,सर्वोच्च न्यायालय व अन्य राज्यांतील न्यायालयांतही त्यांनी राज्यघटना व कायद्यांच्या महत्त्वाच्या प्रकरणांत युक्तिवाद मांडले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारसाठीही काही वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले. कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काही वर्षे त्यांनी काम केले. 22 जून 2006 पासून ते कलकत्ता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून सेवेत आहेत. मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती दत्ता पदभार स्वीकारतील.