esakal | वकिलांची गांधिगिरी; काळ्या कोटावर लावली पांढरी रिबीन, न्यायमूर्तींच्या बदलीचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Justice Z. A. Haq transfer condemn from Lawyers

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग येत्या 24 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी होणाऱ्या बदलीवर स्थगिती न आणल्यास नव्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदनाची प्रत देत विरोध कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती ऍड. भांडारकर यांनी दिली.

वकिलांची गांधिगिरी; काळ्या कोटावर लावली पांढरी रिबीन, न्यायमूर्तींच्या बदलीचा निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या बदलीचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांनी सोमवारी पांढरी रिबीन लावून निषेध केला. सुमारे पाचशे वकिलांनी रिबीन लावल्याची माहिती ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी दिली. 

न्यायमूर्ती झेड. ए. हक यांची नागपूरवरून औरंगाबाद येथे बदली झाल्यानंतर काही वकिलांनी दिलेल्या निवेदनानंतर हायकोर्ट बार असोसिएशनने या बदलीला विरोध करणारा ठराव पारित केला. तरी बदली न थांबल्याने वकिलांनी निषेधाची ही पद्धत अवलंबली. यानंतर गुलाबी, लाल रिबीन लावून निषेध नोंदवला. 

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग येत्या 24 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी होणाऱ्या बदलीवर स्थगिती न आणल्यास नव्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदनाची प्रत देत विरोध कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती ऍड. भांडारकर यांनी दिली. एका वकिलाच्या काळ्या कोटवर पांढरी रिबीन बघून नागपूर खंडपीठाच्या मुख्य न्यायमूर्तींनी त्या वकिलाला जाब विचारल्याची चर्चा बार रूममध्ये ऐकायला मिळाली. पाचशे वकिलांनी रिबीन बांधल्याचा दावा जरी करण्यात आला असला तरी दुसऱ्या सत्रात निषेधाचा सूर काहिसा ओसरल्याचे चित्र उच्च न्यायालयाच्या परिसरात पाहायला मिळाले. 

loading image