

Women Leadership Gains Momentum in Kamthi Civic Body Vice President Race
Sakal
कामठी : येत्या १७ जानेवारी रोजी कामठी नगर परिषदेत उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून, या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून महिला उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आलेल्या अधिकृत नोंदीनुसार कामठी नगर विकास आघाडीकडे सध्या २० नगरसेवकांचे संख्याबळ असल्याची माहिती आहे. या आघाडीत बहुजन समाज पार्टी महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचेही समजते.