

Kamthi Mayor Election 18 Candidates in the Race
Sakal
कामठी : नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ३ उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे रद्द करण्यात आले. नगरसेवक पदासाठी ३४ जागांसाठी २०६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. छाननीदरम्यान काही उमेदवारांच्या अर्जामध्ये आवश्यक संलग्नक नसल्याने अर्ज अपात्र ठरविण्यात आले. रमेश मनोहर बाली (अपक्ष)यांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र जोडले नसल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला. सरमतीया मोहम्मद आसिफ (काँग्रेस) यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचाही अर्ज बाद झाला. सुनील कडगाये (शिवसेना ठाकरे गट) यांनी एबी फॉर्म न जोडल्याने अर्ज रद्द करण्यात आला.