
Border Dispute : नागपूरात कर्नाटकच्या खोडसाळपणाला जोरदार प्रत्युत्तर! ठाकरे गटाने फाडले 'ते' पोस्टर
नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यांमधील सीमावाद मागील काही दिवसांपासून चांगलाच पेटला आहे. यादरम्यान नागपूर विमान तळावर कर्नाटक राज्याच्या पर्यटन विभादाचे पोस्टर लागल्याने नवा वाद सुरू झाला. दरम्यान ठाकरे गटाच्या कर्यकर्त्यांनी हे पोस्टर फाडले आहेत.
नागपूर विमानतळाबाहेरील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या कर्नाटक सरकारच्या पोस्टरमध्ये पर्यटनस्थळाची जाहीरात करण्यात आली होती. कर्नाटक नव्याने पाहूया असा आशयाचे हे पोस्टर होते. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर फाडले आहेत. पोस्टर काढून फेकल्याने या प्रकरणी राजकारण केलं जात आहे. तसेच महाराष्ट्राचे नेते मोठ्या प्रकल्पाची पाहाणी करत असताना हे पोस्टर लावल्याने कर्नाटककडून पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: Yavatmal Accident : यवतमाळमध्ये कार-बसचा भीषण अपघात! चौघे जागीच ठार, १३ गंभीर जखमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार होते, ते नागपूरात येणार त्या रस्त्यवर हे पोस्टर लावण्यात आल्याने जाणिवपूर्वक हे पोस्टर लावण्यात आले होते का असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: मोदींचं कॉंग्रेसबद्दल विधान अन् शरद पवारांच्या डोळ्यात पाणी; आव्हाडांनी सांगितला किस्सा
मागील अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्न सुटलेला नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सध्या दोन्ही राज्यांतील भाजप नेते सीमाप्रश्नी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच या प्रकरणी 30 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.