
नागपूर : नागपूर-फेटरी-काटोल विभागातील राष्ट्रीय महामार्गाचे (३५३-जे) चार पदरी काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची बाब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) विभागीय व्यवस्थापक चंद्रकांत सिन्हा यांनी दिलेल्या माहितीतून पुढे आली आहे. प्रकल्पातील २८.२० किमी लांबीचा टप्पा डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर टायगर कॉरिडॉर (एक) आणि काटोल बायपासच्या कामांना अनुक्रमे थेट जून २०२७ आणि मार्च २०२८ उजाडणार आहे.