
नागपूर : काटोल येथील संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. १५ वर्षे जुन्या न्यायालयीन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हा कारखाना परत एमआयडीसीच्या नियंत्रणात देण्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करीत ही न्यायालयीन लढाई सुरू ठेवली होती.