‘काटोलकन्या’ एमपीएससीत राज्यात द्वितीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

‘काटोलकन्या’ एमपीएससीत राज्यात द्वितीय

sakal_logo
By
सुधीर बुटे

काटोल : बालपणीच पितृछत्र हरविलेल्या ध्येयवेड्या, शिक्षण हेच भविष्य ठरविलेल्या ‘काटोलकन्ये’ने एमपीएससी परीक्षेत महिलांमध्ये द्वितीय, तर ईबीसी वर्गात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. राज्यात सर्व गटातून तिने अकरावे स्थान मिळविले. अशी सुयश मिळविलेली कन्या राधा सुनील भोईटे ही काटोलकरांसाठी अभिमानाचा विषय ठरली. तिची पशुधन अधिकारी म्हणून निवड झाली.

राधा हिने प्राथमिक शिक्षण आठवीपर्यंत नगरपरिषद काटोल शाळेत घेतले. त्यादरम्यान पाचवीत असताना वडिलांचे आजाराने निधन झाले. वडील कोलमाईन्समध्ये नोकरीला होते. आई माया यांच्यावर परिवाराची जबाबदारी आली. राधाचे मामा हेमंत साळुंके यांनी परिवाराला काटोल येथे आणले. राधा हुशार, होतकरू असल्याने तिचा पुढील शैक्षणिक प्रवास नववी व दहावी माऊंट कॉरमेलमध्ये, त्यानंतर सन २०१२ ला बारावीत रुईया ज्युनिअर कॉलेजमध्ये, त्यानंतर पदवी शिक्षण बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स नागपूर येथून केले. २०१७-१९मध्ये मास्टर ऑफ वेटरनरी सायन्स मुबंई येथून केल्यानंतर स्पर्धा परीक्षा तयारीला सुरुवात केली.

हेही वाचा: मराठी भाषा भावनाची डिसेंबर २०२१ मध्ये बांधकामास सुरुवात : मंत्री सुभाष देसाई

कोरोना लाट आल्याने काटोल येथे घरीच नियमित अभ्यास सुरू ठेवला. दरम्यान थोरला भाऊ वैभव हैद्राबाद येथे शिक्षण व जॉब करीत असल्याने राधा हिने तेथे ‘जॉब’ मिळवून उर्वरित वेळात घरीच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अभ्यासात सातत्य, जिद्द यामुळे परिश्रमाला सुयशाने गवसणी दिली. यामुळे राज्यात महिलांमध्ये द्वितीय येण्याचा बहुमान तिने मिळविला. यशाबद्दल सांगताना राधा म्हणाली की मी सर्व अभ्यास घरीच केला. कुठलेही कोचिंग क्लास नव्हते. सिनिअर्स मंडळी आई, मामा व दादांची सदैव प्रेरणा व सहकार्य मला यश मिळविण्यास ‘प्लस’ ठरले.

हेही वाचा: मुंबईत परतीच्या पाऊसाला सुरुवात ?

राधाने परिवाराचे नाव उज्जवल केले

जवाईचे निधन झाल्यानंतर परिवाराला सहारा देण्याची जबाबदारी आमच्यावर आली. माझी भाची अभ्यासू असल्यानं तिने आपले कर्तृत्वाने यश मिळविले. परिवाराचे नाव तर ग्रामीण भागातील मुलगी कसे सुयश मिळवू शकते हे तिने भरघोस यशाने दाखवून दिले. अनेकांना ही प्रेरणा ठरली आहे.

-हेमंत साळुंके, (मामा)

loading image
go to top