Car Overturns and Catches Fire On Akola Highway : अचानक समोर आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार डिव्हायडरला धडकली आहे. यावेळी कारने पलटी होत अचानक पेट घेतला. आज सायंकाळच्या सुमारास खामगावमधील महामार्ग क्रमांक ६ वर हा अपघात घडला. यावेळी कार संपूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे, तर चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.