मटण, चिकन, मासे विक्रेत्यांची खैर नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Non Veg Seller

मटण, चिकन, मासे विक्रेत्यांची खैर नाही

खापरखेडा : खापरखेडा अण्णा मोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मटण, चिकन, मच्छी मासेविक्रेते बेकायदेशीर मुख्य मार्गावर धंदे करीत आहेत. त्यामुळे अनेकांना त्रास होत आहे. आजूबाजूच्या परिसराव्यतिरिक्त रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे संबंधित बेकायदेशीर मटन, चिकन, मच्छी विक्रेत्यांना हटविण्याच्या विरोधात तक्रार केली आहे. मात्र चिकन, मटण, मासे, विक्रेता दुकानदार दुकाने हटविण्यास तयार नाहीत.

पोटा ग्रामपंचायतीचे सरपंच पवन धुर्वे, खापरखेड्याचे ठाणेदार प्रवीण मुंडे, पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी, उपसरपंच विश्वजित सिंग, ग्रामपंचायत सचिव सौरभ जोशी, रंजना कांबळे यांच्यासह सर्व दुकानदारांना बोलावून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र एकही दुकानदार दुकान हटवण्यास तयार नसल्याने अखेर रविवारनंतर एकही मटण, चिकन, मच्छी दुकान उघडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला.

अवैध मार्गाने मटण, चिकन, मासे विक्रेते संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरवतात. यासोबतच भटकी कुत्रीही फिरत असतात. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.