kidney Sale Case: किडनी विक्री प्रकरणी दिल्लीतील डॉक्टर होता ‘पद्मश्री’चा इच्छुक; डॉक्टरचे राजकीय परिवाराशी संबंध..

Organ trafficking Doctors high profile links: किडनी विक्री प्रकरणात दिल्लीतील डॉक्टरचा राजकीय कनेक्शन; पद्मश्रीच्या यादीत होते नाव
Kidney Sale Case Takes Political Turn as Doctors’ High-Profile Links Surface

Kidney Sale Case Takes Political Turn as Doctors’ High-Profile Links Surface

Sakal

Updated on

चंद्रपूर: किडनी विक्री प्रकरणात देशातील दोन प्रतिष्ठित डॉक्टरांची नावे समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही ‘बडे मासे’ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, कोलकाता येथील ज्या पॅथॉलॉजीमध्ये रक्तचाचण्या करण्यात आल्या होत्या, तेथे नागभीड तालुक्यातील रोशन कुडे याला घेऊन विशेष तपास पथक आज बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) तपासासाठी रवाना झाले आहे. दरम्यान, किडनी विक्रीत कोट्यवधी रुपयांची तस्करी होत असून, केवळ पाच ते आठ लाख रुपयेच पीडितांच्या हातात पडत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील दिल्लीतील आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याचे नाव सन २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराच्या इच्छुकांच्या यादीत होते, असे कळते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com