किंगमेकर अटलबहादूर सिंग अनंतात विलिन | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किंगमेकर अटलबहादूर सिंग

नागपूर : किंगमेकर अटलबहादूर सिंग अनंतात विलिन

नागपूर : महापौरपदाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाणारे किंगमेकर अटलबहादूर सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.२०) अंत्यसंस्कार करण्यात आले. चाहते, मित्र व कुटुंबातील सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय अनेक नागपूरकरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. काल, शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली होती.

हेही वाचा: चीनची टेनिसपटू पेंग शुई बेपत्ता

दुपारी बारा वाजता उत्तर नागपुरातील वैशालीनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर कुंदा विजयकर यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक, मनपातील निवृत्त अधिकारी, त्यांचे चाहते मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबातील त्यांचे चुलत बंधू नरेशबहादूर सिंग कुटुंबासह उपस्थित होते.

काल, रात्री माजीमंत्री सतीश चतुर्वेदी, दत्ता मेघे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. आज सकाळपासून त्यांच्या दर्शनासाठी नागरिकांनी रांग लावली होती. शहरातील राजकीय, सामाजिक, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. परंपरेनुसार ४८ तासांचा अखंड पाठ करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांचे आणखी कुटुंबीय दिल्लीवरून येणार आहेत.

loading image
go to top