
नागपूर : वर्तमान परिस्थिती व देशाचे सूत्रसंचालक भारताला आता आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असे सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. आपल्या बळावरच आपली प्रगती होईल. त्यासाठी सर्व प्रकारचे बळ वाढले पाहिजे. आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपले स्वत्व आपल्याला पूर्णपणे कळले पाहिजे असेही ते म्हणाले.