Tiger Attack : परसोडीत वाघाचा थरार; तीन बैलांसह गाय ठार ;गोठ्यात घुसून वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Tiger Attack in Kuhi, Cattle Loss : कुही तालुक्यातील परसोडी येथे वाघाने गोठ्यात घुसून तीन बैल आणि एका गायीवर हल्ला केला. या घटनेत चार जनावरे ठार, तर एक बैल गंभीर जखमी झाला असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
A tiger attacked cattle inside a farmer’s shed in Parsodi village of Kuhi taluka, leaving four animals dead and one seriously injured.

A tiger attacked cattle inside a farmer’s shed in Parsodi village of Kuhi taluka, leaving four animals dead and one seriously injured.

esakal

Updated on: 

साळवा,: कुही तालुक्यातील परसोडी येथे वाघाने गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ७) मध्यरात्री घडली. शेतकरी माधोजी राखडे यांच्या गोठ्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात तीन बैल व एक गाय ठार झाली, तर एक बैल गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, गोठ्याभोवती तारेचे कुंपण असतानाही वाघाने आत प्रवेश करून जनावरांवर हल्ला केला. सकाळी गोठ्यातील भयावह दृश्य पाहून राखडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. आधीच दुष्काळ आणि नापिकीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या घटनेने मोठे संकट ओढवले आहे.

Loading content, please wait...