नागपूर : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ७० लाखांच्या प्रयोगशाळा

नव्या वर्षात होणार सुरू; दोनशे विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी
nagpur municipal corporation
nagpur municipal corporation sakal media

नागपूर : महापालिका(nagpur carporation) शाळेतील विद्यार्थीही प्रयोगशील व गुणवंत असल्याने नुकताच अपूर्व विज्ञान मेळाव्यातून स्पष्ट झाले. महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी(carporation students) सात शाळांमध्ये ७० लाख रुपयांच्या प्रयोगशाळा(Laboratory) तयार करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात या प्रयोगशाळा सुरू होणार असून दोनशे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील प्रयोग करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख(dr. punjabrao deshmukh) स्मृती सभागृहात शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विशेष समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. आमदार प्रवीण दटके(mla pravin datke) यांच्या प्रयत्नातून प्रयोगशाळेसाठी ७० लाखांचे अनुदान मिळाल्याचे प्रा. दिवे यांनी सांगितले.

nagpur municipal corporation
कॅन्सर इन्स्टिट्यूटसंदर्भात मुंबईत बैठक

लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा, एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा, दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा, जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा, राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेत या प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. सध्या मनपा शाळांच्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांना या लॅबमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे मनपाचे विद्यार्थीसुद्धा अभ्यासक्रमातील जवळपास २०० प्रयोग करू शकणार आहेत. बैठकीत समिती सदस्या संगीत गिऱ्हे, सदस्य मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद, मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, सुभाष उपासे, संजय दिघोरे तसेच सर्व शाळा निरीक्षण उपस्थित होते.

nagpur municipal corporation
प्रभाग रचनेतील बदलांसाठी मुंबईत पुन्हा होणार बैठक

नवीन वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश

मनपा शाळेत एकूण १२,६०३ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात गणवेश मिळतील असे मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी यावेळी सांगितले. दहावीचा निकाल वाढविण्यासाठी दोन खासगी संस्थां शिक्षकांना प्रत्येक रविवारी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. शहरात ६ केंद्रात विद्यार्थ्यांना प्रत्येक रविवारी बोलावून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना टॅब

मनपाच्या शिक्षण विभागातर्फे मनपा शाळेतील आठवी ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिले जाणार आहे. जे दिव्यांग विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षण घेता यावे, यासाठी टॅब देण्यात येणार आहेत. याबाबत आज समितीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला.

nagpur municipal corporation
प्रभाग रचना बदलांसाठी मुंबईत पुन्हा होणार बैठक

केजी-१, केजी-२ चे प्रत्येकी दोन वर्ग

शहरात सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या सहाही इंग्रजी शाळांमध्ये एकूण ४८० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होते. मात्र केजी-१ आणि केजी-२ च्या वर्गात एकूण ५५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश जास्त झाल्याने केजी-१ आणि केजी-२ चे दोन-दोन वर्ग सुरू केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com