esakal | महिलांनो, लग्न समारंभात जाता? जरा सांभाळून जा...
sakal

बोलून बातमी शोधा

file

महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून "हात' मारण्यासाठी सज्ज आहे. चोरट्‌यांनी रविवारी कामठी मार्गावरील भाटीया फॉर्म हाऊस येथे आयोजित लग्न समारंभातून एका महिलेचे एक लाख दहा हजाराचे मंगळसूत्र आणि दोघांचे पैसे व मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

महिलांनो, लग्न समारंभात जाता? जरा सांभाळून जा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून "हात' मारण्यासाठी सज्ज आहे. चोरट्‌यांनी रविवारी कामठी मार्गावरील भाटीया फॉर्म हाऊस येथे आयोजित लग्न समारंभातून एका महिलेचे एक लाख दहा हजाराचे मंगळसूत्र आणि दोघांचे पैसे व मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.


क्‍लिक करा :  तो कुबडयांचा आधार घेत आला, अन्‌ धावू , उडी मारू लागला

चोरट्यांचा शहरात सुळसुळाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगृहनगर नारी रोड येथे राहणाऱ्या रामकृष्ण पाटील यांच्या मुलीचे रविवारी कामठी मार्गावरील भाटीया फॉर्म हाऊस येथे लग्न होते. पाटील यांच्या शेजारी राहणारे विनोद फत्थुजी लोखंडे (47) हे कुटुंबियांसह लग्न समारंभाला गेले होते. लग्न लागल्यानंतर लोखंडे आणि त्यांची स्टार्टरच्या टेबलकडे गेले. त्यावेळी स्टार्टरच्या टेबलवर बरीच गर्दी होती. लोखंडे डोसा घेण्यासाठी गेले असता त्यांच्यामागे असलेल्या एका तरुणीने त्यांच्या खिशात हात टाकला. कुणीतरी खिशात हात टाकल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या मुलीचा हात पकडून दुसऱ्या हाताने पैशाचे पाकीट पकडून ठेवले. दरम्यान, गर्दीतील इतर चोरांनी लोखंडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील एक लाख दहा हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. डोसा खाऊन जेवण केल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास लोखंडे दाम्पत्य घरी जाण्यासाठी निघाले असता मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लोखंडे यांच्या पत्नीच्या लक्षात आले. लगेच त्यांनी शहर नियंत्रण कक्षाला माहिती दिली. दरम्यान, याच चोरांनी पांडे यांच्या खिशातील 5 हजाराचा मोबाईल आणि निरज निकोसे यांच्या खिशातील 3 हजार रुपये चोरून नेले. नवीन कामठी पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी फॉर्म हाऊसमधील स्टार्टर टेबल लावलेल्या परिसराची पाहणी केली असता तेथे सीसी कॅमेरा नसल्याचे दिसून आले.


क्‍लिक करा :  तुम्ही कोणत्या हक्‍काने "रिपाइ' शब्दाचा वापर करता...कोणी केला हा प्रश्‍न उपस्थित

महिला चोरट्यांचा प्रताप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निटनिटके कपडे घालून चोरी करणारी टोळी लग्न समारंभात घुसते. लग्नातील वऱ्हाडी असतील असे समजून कुणीही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. गर्दीचा फायदा या टोळीतील तरुणी पुरूषांच्या खिशातील पैशाचे पाकिट, मोबाईल आणि महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करीत असल्याची माहिती आहे. इतर सदस्य चोरी करणाऱ्या सहकाऱ्यांना किंवा ज्याला सावज करायचे असते त्याचे लक्ष विचलित करीत असतात. ही टोळी नव्यानेच उदयास आल्याची माहिती आहे.

loading image