
नागपूर - महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना सध्या चांगलीच गाजत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत राज्यात सत्ता आल्यास महिलांना प्रतिमहिना आठ हजार रुपये देण्याची घोषणा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली.