esakal | मुख्यमंत्री साहेबऽऽ आता साधणार का संवाद? तुमच्याच नेत्याने मोडले कोरोनाचे सर्व नियम

बोलून बातमी शोधा

A large crowd of citizens attended Sanjay Rathores program

वाशीम जिल्ह्यात असलेल्या बंजारा समाजाचे कुलदैवत पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी कोली होती. गर्दीने कोरोनोचे सर्व नियम पायदळी तुडवले होते. अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडाला होता. यामुळे कोरोनाचा स्प्रेड वाढल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री साहेबऽऽ आता साधणार का संवाद? तुमच्याच नेत्याने मोडले कोरोनाचे सर्व नियम
sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : गेल्या रविवारी सायंकाळी सात वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वाढत्या कोरोना विषाणूवर भाष्य केले. महाराष्‍ट्रात कोरोना वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘नियम पाळा आणि कोरोना टाळा’ असे आवाहन केले. पुढील दहा-पंधरा दिवसात वाढता आकडा आटोक्यात न आल्यास लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशाराही दिला. आता त्यांच्याच पक्षातील नेते संजय राठोड यांच्या कार्यक्रमात झालेली गर्दी पाहून ‘मुख्यमंत्री साहेबऽऽ आता साधणार का संवाद? तुमच्याच नेत्याने मोडले कोरोनाचे सर्व नियम’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना चांगलाच आकडा वाढायला लागला आहे. रोज होणारी रुग्णांची वाढ आणि मृत्युमुळे सरकारची चिंता वाढली आहे. यामुळेच यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधत ‘नियम पाळा आणि कोरोना टाळा’ असे आवाहन केले. याला नागिरकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. मात्र, संजय राठोड यांना हा नियम लागू होत नसल्याचे आजच्या घटनेवरून पाहायला मिळाले.

नवीन माहिती : संजय राठोड दोन दिवसांपासून यवतमाळातच मुक्कामी!

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले. दुसरीकडे पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येत नाव आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या शासकीय कार्यक्रमाला परवानगी दिली. तब्बल चौदा दिवसानंतर राठोड नागरिकांच्या समोर आले. माऊ, त्यांच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी कोरोना वाढवणारी ठरली आहे.

वाशीम जिल्ह्यात असलेल्या बंजारा समाजाचे कुलदैवत पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी कोली होती. गर्दीने कोरोनोचे सर्व नियम पायदळी तुडवले होते. अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडाला होता. यामुळे कोरोनाचा स्प्रेड वाढल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी

वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यक्रमाला शासनाने परवानगी दिली. तसेच कार्यक्रमासाठी फक्त पन्नास लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. मात्र, राठोड यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाला गर्दी होईल याची सरकारला कल्पना नव्हती का, असा प्रश्न आहे.

Sanjay Rathod : माझी बदनामी करू नका आणि रॉंग बॉक्समध्ये टाकू नका; चौकशीत सर्व सत्य समोर येईल

गर्दीला कोण जबाबदार?

राठोड यांच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. वनमंत्री संजय राठोड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही तर जबाबदार नाही ना, असा प्रश्न चर्चेला जात आहे. एकीकडे शरद पवार, अजित पवार सारख्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे गर्दीला कोण जबाबदार, हा प्रश्न चांगलाच चर्चेला जात आहे.