
दुपारी दोन वाजता धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराज देवस्थानात देवदर्शनासाठी जाणार आहेत. तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यवतमाळ येथे येऊन कोरोनाचा आढावा घेऊन उपाय योजना सुचविणार आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा असून ते माध्यमासोबत काय बोलतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे दोन दिवसांपासून यवतमाळातच आपल्या निवासस्थानी मुक्कामी असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. आज ते सकाळी १० वाजता पोहोरागड येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. तसा त्यांचा अधिकृत दौराही जाहीर झाला आहे.
परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी अजूनही त्यांच्या निवासस्थानी डेरेदाखल आहेत. ते कधी समोर येतात याची प्रतीक्षा करीत आहेत.
ते बाहेर येताच थेट पोहोरागड येथे जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती आहे. दुपारी दोन वाजता धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराज देवस्थानात देवदर्शनासाठी जाणार आहेत. तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यवतमाळ येथे येऊन कोरोनाचा आढावा घेऊन उपाय योजना सुचविणार आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा असून ते माध्यमासोबत काय बोलतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
दारव्हा येथे दुपारी दोन वाजता मुंगसाजी महाराजांचे दर्शन घेऊन दुपारी चारला वनमंत्री राठोड यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरानाबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यांचा अधिकृत दौरा देण्यात आलेला नाही.
वनमंत्री संजय राठोड जनता आणि माध्यमांसमोर कधी येणार, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला होता. तब्बल १४ दिवस नॉट रिचेबल असलेलले वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला येणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्येशी नाव जोडले गेल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.