Dikshabhumi Sohala : यंदा धम्मदीक्षा सोहळ्यात नेते दिसणार नाहीत; राजेंद्र गवई यांनी दिली माहिती

यंदा धम्मदीक्षा सोहळ्याच्या धम्ममंचावर राजकीय व्यक्तींना बोलविणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
dikshabhumi nagpur
dikshabhumi nagpursakal
Updated on

नागपूर - यंदा धम्मदीक्षा सोहळ्याच्या धम्ममंचावर राजकीय व्यक्तींना बोलविणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव राजेंद्र गवई यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या विषय निकाली निघाला आहे. खड्डा बुजविण्याचे काम जलद करण्याची मागणी करीत गवई म्हणाले, धम्मदीक्षा सोहळ्याची रूपरेषा ठरली आहे. धम्ममंचावर बौद्ध भन्तेशिवाय कोणीही बसणार नाही. राजकीय व्यक्तींना निमंत्रण न देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. पत्रपरिषदेला विश्वस्त विलास गजघाटे, भदंत नाग दीपांकर व एन.आर.सुटे उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com