

Leelatai Chitale addresses the Vidarbha Women’s Liberation Conference
Sakal
नागपूर : तुमच्याजवळ भारताची राज्यघटना आहे. जी स्वातंत्र्य, समानता देते. स्वातंत्र्यलढ्यात महिला रणरागिणींचा वारसा फार मोठा आहे. इंग्रजांच्या बंदुकीसमोर उभे राहून आम्हाला स्वातंत्र्य द्या, म्हणणाऱ्या कमलादेवी चटोपाध्याय, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित आदींचा वारसा सांभाळणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्य संग्राम सेनानी लीलाताई चितळे यांनी आज येथे केले.