...तर आपणच कशाला पुढाकार घ्यायचा; शिवसैनिकांना काही सुचेना!

Shivsena
ShivsenaShivsena

नागपूर : उमेदवाराला गरज नसेल तर आपणच कशाला पुढाकार घ्यायचा अशी मनःस्थिती शिवसैनिकांची (shivsena) झाली आहे. मतदानाच्या दिवशी ते कोणाच्या पारड्यात मते टाकतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसने डॉ. रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवारी दाखल करून दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्याप एकाही शिवसेना सदस्याची भेट घेतलेली नाही. शिवसेनेकडे एकूण २५ मतदार आहेत. विजयासाठी २८१ मतांचा आकडा गाठण्यासाठी शिवसैनिकांची संख्या महत्त्वाची आहे.

काँग्रेसचे नेते आणि उमेदवाराने आमच्याशी कुठलाच संपर्क साधला नाही. त्यामुळे मतदान कोणाला करायचे हे आम्ही वेळेवर ठरवू असे शिवसैनिकाने सांगितले. पक्षाच्यावतीने आघाडीसोबत राहण्याच्या सूचना आहेत. आमच्या सर्वांची आघाडीसोबत राहण्याची इच्छा आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या मतांची गरज नाही असे वाटत असेल तर मतदानाच्या दिवशी कोण काय करेल याची हमी देता येणार नसल्याचेही एका सदस्याने सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) ग्रामीणमध्ये प्रचंड उत्साह असतो. बैठका, दौरे सुरू असतात. जिल्हा परिषदेचे सदस्य, नगर परिषदेचे नगरसेवकांमध्ये चैतन्य असते. यावेळी निवडणूक आहे असे कुठलेच चित्र ग्रामीण भागात दिसत नाही. निवडणूक आहे आपल्या उमेदवाराकडे लक्ष ठेवा, असेही कोणी म्हणताना दिसत नाही. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.

Shivsena
पक्षांतराचे धक्के; काँग्रेसचा नेता राष्ट्रवादीत तर भाजपचा काँग्रेसमध्ये

काँग्रेसतर्फे दोन्ही पक्षाला गृहित धरत असल्याचे दिसून येते. आमच्याशिवाय पर्याय नाही असे कदाचित काँग्रेसला वाटत असावे. शिवसेना जिल्ह्यात मोठी होऊ नये असे छुपे प्रयत्न आधीपासूनच काँग्रेसच्या नेत्यांचे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर याचा अनेकदा प्रत्यय आला. शासकीय समित्या वाटप करतानाही शिवसेनेला दुय्यम स्थान देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत बैठकीलासुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी बोलावले नव्हते. या सर्व नाराजीचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रवींद्र भोयर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र, त्यांनी वा काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी शिवसेनेच्या सदस्यांसोबत तसेच नेत्यांसोबत कुठलाही संपर्क साधला नाही. पक्षाने आम्हाला महाविकास आघाडीसोबत राहण्याची सूचना केली आहे. परंतु, काँग्रेसला शिवसेनेची मदत घ्यावी असे वाटत नाही असेच दिसून येत आहे.
- राजेंद्र हरणे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com