
नागपूर : सेमिनरी हिल्स येथील वन्यप्राणी बचाव केंद्राच्या पथकाने घेतलेल्या परिश्रमांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कवडस वन परिक्षेत्रातील देवरी पेंढरी शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढले. ते आईपासून विभक्त झाले होते. या पिल्लाला त्याच्या आईसोबत सोडण्यात आले.