
कोंढाळी : कोंढाळी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या चिखली–काजळी रस्त्यालगतच्या नाल्यात शुक्रवारी (दि. १८ जुलै) दुपारी एक वाजता बिबट्याची नर व मादी अशी दोन एक महिन्यांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना ढोबळे यांच्या शेताजवळ घडली असून गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.