Nagpur Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

बान्सी येथील सुनील वाघोजी बोखारे याने घरगुती वादावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने जन्मठेप सुनावली. शिवाय दहा हजार रुपये दंडही ठोठाविला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी शिक्षा सुनावली, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला.
Nagpur Crime News
Nagpur Crime Newssakal

पुसद (जि. यवतमाळ) : बान्सी येथील सुनील वाघोजी बोखारे याने घरगुती वादावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने जन्मठेप सुनावली. शिवाय दहा हजार रुपये दंडही ठोठाविला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी शिक्षा सुनावली, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला.

या खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील महेश निर्मल यांनी काम पाहिले. खटल्याची हकीकत अशी की बान्सी (ता. पुसद) येथील आरोपी सुनील वाघोजी बोखारे हा पत्नी मनीषासोबत एकत्र कुटुंबात राहत होता. सहा ऑगस्ट २०१७ रोजी सर्व कुटुंबाने सोबत जेवण केल्यानंतर रात्री पती सुनील व मनिषा त्यांच्या खोलीत झोपण्यास गेले.

सकाळी चारदरम्यान सुनीलच्या आईला जागी झाली असता तिला सुनील व मनीषाच्या खोलीचे दार उघडे दिसले. तिने खोलीमध्ये जाऊन पाहिले असता मनीषाचा मृतदेह पलंगाच्या बाजूस खाली पडलेला होता व सुनील बाजूला उभा होता. मनीषाच्या गळ्यावर व चेहऱ्यावर ओरखडे होते. आईने सुनीलला विचारणा केली असता मनीषा पडली आहे आणि बेशुद्ध झाली आहे, असे तो म्हणाला. त्यामुळे त्याच्या आईने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलाविले.

मनीषा हिला पुसद येथे दवाखान्यामध्ये नेले असता ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.मनीषा मृत झाल्याचे कळताच सुनील दवाखान्यामधुनच फरार झाला.मनीषाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर तिचे माहेरचे लोक बान्सी येथे आले व सुनीलच्या गैरहजेरीत शवविच्छेदनानंतर अंतिम संस्कार करण्यात आला.

Nagpur Crime News
Nashik Crime News : ओझरला घरफोडी! अज्ञात चोरट्यांनी चोरले घराचे दरवाजे

शवविच्छेदनामध्ये मनीषाचा गळा दाबून खून केल्याचे डॉक्टरांनी अहवाल दिला. मनीषाच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली की, आरोपी सुनील हा पत्नी मनीषा हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता आणि त्यानेच मनीषाचा गळा दाबून खून केला आहे. पुसद ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक धनंजय जगदाळे यांनी प्रकरणाचा तपास केला व साक्षिदारांचे बयाण नोंदविले. त्यानंतर सबळ पुरावे उपलब्ध करून दोषारोपपत्र दाखल केले. गुन्हा सिद्ध झाल्याने येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांनी शिक्षक ठोठाविली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com