दुग्ध व्यावसायिकाने भरविले पशुप्रदर्शन; शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पशुसंवर्धन विभागाने घेतली दखल

Livestock show filled with dairy professionals
Livestock show filled with dairy professionals

हिंगणा (जि. नागपूर) : शेती व्यवसाय दिवसेंदिवस निसर्गाच्या प्रकोपामुळे घसरणीवर आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू करावा, या हेतूने कवडस येथील दुग्ध व्यावसायिक ज्ञानेश्वर लांडे यांनी स्वतःकडे असलेल्या जनावरांचे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी भरवले.

हिंगणा तालुक्यातील पठारावरील भाग म्हणून कवडस व मोहगाव ढोले परिसर ओळखला जातो. खडकाळ भाग असल्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागते. अशा परिस्थितीत दुग्धव्यवसाय करून शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.

मोहगाव ढोले येथील ज्ञानेश्वर लांडे यांच्याकडे अनेक वर्षांपासून दुग्धव्यवसाय सुरू आहे. अनेक प्रजातींच्या गायी व म्हशी त्यांच्याकडे आहेत. या जनावरांचे प्रदर्शन त्यांनी गावातीलच दुग्धव्यवसाय करीत असलेल्या जागेवर भरवले.

यावेळी शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासंदर्भातील जनावरांची माहिती देण्यात आली. शेती व्यवसाय निसर्गामुळे डबघाईस आला, तरी शेतकऱ्यांनी न डगमगता दुग्धव्यवसाय करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी, असे आवाहन दुग्ध व्यवसायिक लांडे यांनी केले. यावेळी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

हिंगणा तालुक्यात प्रथमच एका दुग्ध व्यवसायिकांने स्वतः पशुप्रदर्शन आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा अभिनय प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगाला जवळपास ३०० शेतकऱ्यांनीही हजेरी लावली. पशुसंवर्धन विभागाने या पशुप्रदर्शनाची दखल घेतली. लांडे यांच्या दुग्ध व्यवसायासंदर्भातील कामाचे कौतुकही अधिकाऱ्यांनी यावेळी केले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com