esakal | इंग्रजी शाळांत सोमवारपासून प्रवेशासाठी लॉटरी, 'असा' करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

online exam

इंग्रजी शाळांत सोमवारपासून प्रवेशासाठी लॉटरी, 'असा' करा अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेने (nagpur municipal corporation) सहा विधानसभा क्षेत्रात सुरू केलेल्या सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना (english school of nmc) पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रवेश अर्जाची वाढती संख्या लक्षात घेता २ ऑगस्टपासून प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ३१ जुलैपर्यंत खुल्या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी केले आहे. (lottery for english school admission starts from monday in nagpur)

हेही वाचा: दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका

शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून निःशुल्क प्रवेश मिळावा यासाठी मनपाने आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने शहरात सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. मनपाच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांचे या शैक्षणिक सत्रापासून वर्ग होणार आहेत. पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये गरोबा मैदान येथील बाभुळबन मनपा प्राथमिक शाळा, पश्चिम नागपुरात रामनगर मनपा प्राथमिक शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरात चिंचभवन येथील स्व. बाबूराव बोबडे मनपा प्राथमिक शाळा, मध्य नागपुरात हंसापुरी येथे स्व. गोपालरावजी मोटघरे मनपा प्राथमिक शाळा, दक्षिण नागपुरात म्हाळगी नगरातील रामभाऊ म्हाळगीनगर मनपा प्राथमिक शाळा आणि उत्तर नागपुरात राणी दुर्गावतीनगरातील राणी दुर्गावती मनपा प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. या सर्व शाळांमध्ये ज्युनिअर केजी व सिनिअर केजी या वर्षांसाठी प्रवेश प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. सर्व शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शाळांमध्ये काही मोजक्या जागाच शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन मिश्रीकोटकर यांनी केले आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोय -

इच्छुक पालकांनी ३१ जुलैपर्यंत शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश अर्ज भरावा किंवा https://forms.gle/NTFq8a36ndVkUuHs9 या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहनही शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी केले आहे.

loading image
go to top