दुरून कुटुंबीयांना बघताच प्रेमीयुगुलाची आत्महत्या; करुण अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lovers Suicide in well

दुरून कुटुंबीयांना बघताच प्रेमीयुगुलाची आत्महत्या; करुण अंत

समुद्रपूर (जि. वर्धा) : मुलगी हरवल्याची तक्रार आईने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, ती गावातील युवकासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली. घरच्यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. कुटुंबीय मागावर असल्याचे कळताच या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या (Lovers Suicide) केली. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला गावात मंगळवारी (ता. २९) उघडकीस आली. (Lovers Suicide in well)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शालिक ठाकरे (२६, रा. बेला, जि. नागपूर) (Nagpur) याचे गावातील १५ वर्षीय मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे. यातूनच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलाने मुलीकडील आणि स्वतःच्या कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना घरी परत येण्याची विनंती केली.

हेही वाचा: मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे; नदीत फेकले

मात्र, ‘प्रेमसंबंध तोडले जातील, जेलमध्ये टाकेल’ म्हणून आम्ही परत येणार नाही असा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यांची माहिती मिळताच नातेवाईक कुर्ला येथे पोहोचले. दुरूनच कुटुंबातील सदस्य दिसताच कुर्ला शिवारातील शेतकरी कमलेश कांबळे यांच्या विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या (Lovers Suicide) केली. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूरचे ठाणेदार प्रशांत काळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून प्रेमीयुगुलांचे मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.

उपाययोजना ठरल्या फोल

मुलगा आणि मुलीचा कुटुंबीयांकडून शोध सुरू असताना ते वर्धा जिल्ह्यातील कुर्ला गावात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे कुटुंबीय त्यांचा शोध घेण्यासाठी कुर्ला गावात पोहोचले. प्रेमीयुगुलांना दूरवरून घरची मंडळी दिसली. ते आपल्याला पकडून घरी नेतील आणि एकमेकांपासून दूर करतील या भीतीपोटी दोघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Lovers Suicide) केली. मात्र, त्यांना वाचविण्यासाठी केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या.