LPG Cylinder Price Hike in Nagpur Sparks Customer Dispute
esakal
नागपूर: मध्य-पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कारण देत घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत तब्बल ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वीच जुन्या दराने ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांकडूनही वाढीव रक्कम वसूल केल्याचा आरोप होत असल्याने शहरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.