
कोतवाल बड्डी (ता. काटोल) : घटनास्थळाचे दृश्य पाहिल्यास ३१ कामगारांपैकी नशिबानेच कुणाचे प्राण वाचले असावे, असे प्रत्येकाला वाटत होते. कारण, घटनास्थळच नव्हे तर बाजूचे जंगल, संपूर्ण शेतशिवार स्फोटाच्या ठिणग्यांनी आपल्या कवेत घेतले होते. स्फोट झाला तेव्हा पॅकेजिंग विभागात काम करणाऱ्या १९ महिला कामगार ‘लंच टाईम’ असल्याने जेवणासाठी काही अंतरावर गेल्या होत्या. यामुळे त्या बचावल्याने सर्वांनी दैवाचे आभार मानले.