esakal | कोरोना झालेल्या रुग्णांना फुप्फुसाचे विकार; पाच युवकांवर सुरू आहे नागपुरात उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Lung disorders in corona recovery patients

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लंग फायब्रोसिस होत असल्याचे दिसून आले आहे. लंग फायब्रोसिस या रोगात फुप्फुसातील उतक म्हणजेच टिश्यू सुजण्यास सुरुवात होते. यामुळे फुप्फुसांच्या आतल्या हवेची जागा कमी होऊ लागते. याचा परिणाम म्हणजे श्वास घेण्यात अडचण होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोना झालेल्या रुग्णांना फुप्फुसाचे विकार; पाच युवकांवर सुरू आहे नागपुरात उपचार

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनातून बरे झालेल्यांना कोरोनाचा धोका पुन्हा आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना फुप्फुसाचे विकार बळावत असल्याची माहिती पुढे आली आहे. पाच ते सहा तरुणांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना फुप्फुसाच्या (लंग फायब्रोसिस) विकारांनी विळख्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक विळखा राज्यातील पुणे, मुंबई, औरंगबादसह नागपूर या मोठ्या शहरांना बसला आहे. राज्यात २० लाखांचा आकडा कोरोनाबाधितांनी पार केला आहे. या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्काही वाढला आहे. ८५ टक्के कोरोनाच्या रुग्णांनी कोरोनाला हरवले. मात्र, कोरोनामुक्तीनंतर मात्र या व्यक्तींना हृददापासून तर फुप्फुस आणि मेंदूच्या समस्या जाणवू लागल्याचे वैद्यकीय क्षेत्र सांगते.

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहेत. मात्र, पोस्ट कोविड सेंटरला अद्ययावत करण्याची गरज आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले रुग्ण हे पस्तिशीतील आहेत. यामुळे जनमानसात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ही समस्या गंभीर असेल तर रुग्णाचे जीव धोक्यात येऊ शकतात.

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लंग फायब्रोसिस होत असल्याचे दिसून आले आहे. लंग फायब्रोसिस या रोगात फुप्फुसातील उतक म्हणजेच टिश्यू सुजण्यास सुरुवात होते. यामुळे फुप्फुसांच्या आतल्या हवेची जागा कमी होऊ लागते. याचा परिणाम म्हणजे श्वास घेण्यात अडचण होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - कोणत्या खात्यात जास्त पैसे आहेत’ असे विचारल्यावरही उघडले नाही डोळे; मग आली रळण्याची वेळ

आरोग्य विभाग कशी करेल पोस्ट कोविडनंतरची देखभाल?

कोरोनावर मात केल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांना विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना किडनी, फुप्फुस, मेंदू आणि हृदयाचे विकार जडत आहेत. तर काहींना मानसिक आजार होत आहेत. काहींना फुप्फुसात फायब्रोसिस, लवकर थकवा येणे अशा समस्यांना सामोरे जावा लागत आहे. कोरोनामुक्तांचे हे प्रमाण बघता पोस्ट कोविड सेंटर राज्यभर उभारले जात आहेत. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबधित जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात ही सेवा देणारे तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. सेकंडरी दर्जाची सेवा असते. यामुळे आरोग्य विभागाची रुग्णालये पोस्ट कोविडनंतरची सेवा देण्यास असमर्थ असतील, अशीही चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top