

CBI officials conduct a search at a residence in Nagpur in connection with the Mahadev online betting investigation
esakal
नागपूर, : रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग रॅकेटमध्ये सहा हजार कोटींच्या घोटाळ्याचे नागपूरचे कनेक्शन उघडकीस आले आहे. या प्रकरणात शनिवारी (ता. १३) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रवीनगरातील एका घरावर छापा टाकून झडती घेतली.
संबंधित घर एका पॅनेल ऑपरेटरशी निगडित असून, तो महादेव बेटिंग प्लॅटफॉर्मवर ग्राहकांचे खाते चालविणे, बेटिंगसाठी पैसे गोळा करणे आणि खात्यांमध्ये पॉइंट जमा करीत होता. या कारवाईत सीबीआयने महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव बेटिंग ॲपचे नेटवर्क फ्रँचायझी पद्धतीने चालत होते.