

Nagpur News
sakal
कामठी : कोराडी येथील ‘महाजेनको’च्या ६६० केव्ही वीजनिर्मिती प्रकल्पात सोमवारी (ता. १५) विषारी वायूच्या गळतीनंतर १८ कामगारांना नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओझोन वायूच्या गळतीमुळे कामगारांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली होती.