
नागपूर : राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महाज्योतीची स्थापना करण्यात आली आहे. शासनाकडून निधीही मिळतो. मात्र, ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची संख्या अधिक असल्याने हा निधी अपुरा ठरतो आहे. महाज्योतीसाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधानपरिषदेत केली.