

ACB Trap Action Against Agriculture Assistant for Demanding 55000 Rupees Bribe and Accepting 40000 Rupees During the Operation
sakal
वर्धा : बंधाऱ्याच्या बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारणाऱ्या कृषी सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायक म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.