Agriculture:दहा हजार भाव मिळण्याची अपेक्षाभंग! नवीन तूर बाजारात; मात्र आवक वाढण्याआधीच भावात घसरण सुरू

यावर्षीच्या हंगामातील नवीन तूर बाजार समितीत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आवक वाढण्याआधीच तुरीच्या भावात घसरण पहावयास मिळत आहे.
Toor Dal Rates
Toor Dal RatesSakal

Maharashtra Agriculture News : यावर्षीच्या हंगामातील नवीन तूर बाजार समितीत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आवक वाढण्याआधीच तुरीच्या भावात घसरण पहावयास मिळत आहे. रिसोड बाजार समितीत अत्यल्प प्रमाणात तुरीची आवक असूनसुद्धा भाव केवळ सहा हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे.

परिणामी यावर्षी किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल तूरीला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र सदर अपेक्षाभंग होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

यावर्षी तुरीचे पीक पक्व होण्याच्या अवस्थेत असतानाच अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, आपसुकच उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. काही भागात तर उत्पादन खर्च वसूल होने सुद्धा मुश्कील झाले आहे. पण ज्या पिकाच्या उत्पादनात घट होते त्या शेतमालाला चांगला भाव मिळतो हा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे.

त्यामुळे यावर्षी तुरीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतू सद्यस्थितीत हलक्या व मध्यम जमिनीतील तुरीचे पीक काढणीस आले असून सदर मालाची आवक बाजार समितीत येण्यास सुरुवात झाली आहे. आज दि. ३१ डिसेंबर रोजी रिसोड बाजार समितीत जेमतेम शंभर क्विंटलच्या आसपास तुरीची आवक होती.

तरीसुध्दा भावात घसरण पहावयास मिळाली. आणखी काही दिवसात जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे तुरीचे पीक काढून तयार होणार आहे. त्यामुळे जानेवारी २०२४ च्या अखेर व फेब्रुवारी महिन्यात बाजार समितीत तूर पिकाची आवक वाढणार आहे आणि आवक वाढली की भाव आणखीनच घसरतात हा सुद्धा शेतकऱ्यांचा नेहमीचा अनुभव आहे.(Latest Marathi News)

Toor Dal Rates
लाल समुद्रातील हुथी बंडखोरांचा हल्ला अमेरिकेने हाणून पाडला; तीन जहाजं बुडवले, 10 जणांचा खात्मा

माझी तीन एकरात तूर असून, मध्यंतरी आलेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात आळ्यांचा प्रादुर्भाव झाला होता. महागडे कीटक नाशक औषधे फवारून सुद्धा आळ्यांनी तुरीचा पहिला बहर फस्त करुन टाकला आहे. आणि दुसऱ्या बहरातील जेमतेम शेंगा पक्व झाल्या आहेत. त्यामुळे तीन एकरात तीन पोते तूरी होतील कि नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच भाव सुद्धा घसरत चालले आहेत. अशा बिकट परिस्थितीमुळे आथिर्क चिंता सतावत आहे.
- दिनेश एकनाथ मवाळ ( शेतकरी, महागाव ता. रिसोड )

हमीभाव केवळ कागदावरच...
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार अशी २०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. जणेकरून उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या पन्नास टक्के नफा हमीभावातून शेतकऱ्यांना मिळेल हा त्यामागचा उद्देश होता. मात्र अद्याप पर्यंत तरी कुठल्याच बाजार समितीत हमीभाव ही प्रणाली काटेकोरपणे पाळल्यागेली असल्याचे एकही उदाहरण शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे सरकारकडून जाहीर करण्यात आलेली हमीभावाची घोषणा केवळ कागदावरच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. (Latest Marathi News)

Toor Dal Rates
Delhi Weather Update: धुकं आणि प्रदूषणाची चादर! दिल्ली-एनसीआरला वर्षाच्या पहिल्याच दिवशी फटका, 21 ट्रेन धावल्या उशिराने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com