
नागपूर : शहरातील चार ठाण्यांचे विभाजन करून त्यातून चार नवीन पोलिस ठाण्यांना गृहविभागाने मंजुरी दिली आहे. या ठाण्यांसाठी विभागाकडून २६९ पदे मंजूर करण्यात आली असून त्यात पिपळा, कान्होलीबारा, भिलगाव आणि कळमना गाव या ठाण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नवीन ठाणे तयार करताना, हुडकेश्वर, कळमना, हिंगणा व यशोधरानगर पोलिस ठाण्यांचे विभाजनही करण्यात आले आहे.