esakal | ...तर जीवहानी होऊ शकली असती; धोरण सरकारने ठरवण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

...तर जीवहानी होऊ शकली असती; सरकारने धोरण ठरवण्याची वेळ

...तर जीवहानी होऊ शकली असती; सरकारने धोरण ठरवण्याची वेळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : काँग्रेस हा पक्ष लोककल्याणासाठी आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे, ती निसर्गाशी छेडखानी केल्यामुळेच. ढगफुटीसारखे प्रकार निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे होतात. वृक्षतोड व उत्खणन याचाही प्रभाव निसर्गावर होत आहे. पहाडी भागात उत्खणन कशा पद्धतीने केले पाहीजे, झाडे कशी जोपासली गेली पाहीजे. याचे धोरण सरकारने ठरवण्याची वेळ आल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. (Nana-Patole-Congress-party-heavy-rainfall-Cloudburst-nad86)

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील जांभळी गावात पुराने थैमान घातले. पहाड कोसळल्याने मलब्याखाली प्रेते दबलेली आहेत. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ढगफुटी आणि पुरामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये यापेक्षाही भयावह स्थिती होती. मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी होते. मुंबईतही लोकं वाहून गेली होती, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा: पॉर्न सर्चिंग : पुणे पहिल्या, नाशिक दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

सरकार नागरिकांची पूर्णपणे मदत करीत आहे. मुख्यमंत्री स्वतः कंट्रोल रूममधून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नुकसानग्रस्त भागाचा दौराही त्यांनी केला आहे. त्यामुळे या घटनांचे कुणी राजकारण करू नये. ही वेळ राजकारणाची नाही, तर लोकांच्या मदतीला धावून जाण्याची आहे. कुणी, केव्हा, काय केले याचा विचार आम्ही करीत नाही. तर आता काय केले पाहिजे, त्याला महत्व देतो, असे नाना पटोले म्हणाले.

जेसीबीने पाण्याची दिशा बदलविली

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील जांभळी गावात पुराने थैमान घातले असताना तेथे प्रशासन पोहोचलेच नाही, हे खरे आहे. परंतु, युवक कॉंग्रेसचे पोर जांभळीत पोहोचले होते. रात्री उशिरा त्यांनी जेसीबीने पाण्याची दिशा बदलविली आणि गाव वाचवले. युवक काँग्रेसचे पदाधिकारी जांभळीत वेळेत पोहोचले नसते, तर या गावातही जीवहानी होऊ शकली असती, अनेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा: अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

सरकार कटिबद्ध

ही वेळ लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची आहे. त्यांचे दुःख वाटून घेऊन घेण्याची आहे. झालेल्या नुकसानातून लोकांना सावरून घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नाना पटोले म्हणाले.

(Nana-Patole-Congress-party-heavy-rainfall-Cloudburst-nad86)

loading image
go to top