Maharashtra Floods
sakal
नागपूर
Maharashtra Floods: अतिवृष्टीच्या लक्षवेधीवरून सरकारची नामुष्की; संबंधित विभागाकडून उत्तराची प्रतच नाही, भास्कर जाधव यांचा संताप
Excess Rain and Flood Damage Across Maharashtra: जून ते सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे ६५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान झाले. विरोधकांनी सभागृहात लक्षवेधी विचारत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला.
राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीवरील लक्षवेधीवर चर्चा करण्यासाठी मंत्री आणि सदस्य विधिमंडळात उपस्थित होते. मात्र विभागाकडून उत्तराची प्रतच दिली गेली नाही. त्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलावी लागल्याने विरोधी पक्षातील ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी मंत्र्यांसह तालिका अध्यक्ष यांनाच जाब विचारला. तसेच सभागृहाच्या कामकाजावर आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला.

