
नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपायांचे रिक्त आणि रिक्त होणाऱ्या १५ हजार ६३१ पदांच्या भरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या बाबत मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने बुधवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला असल्याची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.