Manoj Jarange: ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भूमिका असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मात्र जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वाद वाढले आहेत.
नागपूर : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. त्या भूमिकेतून सरकार पुढे जात आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारंवार अपमान केला जातो.