

Joyful Moment for Education Sector as ZP Schools Get Sports Teachers
Sakal
नागपूर: महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी क्रीडा शिक्षकांच्या ४ हजार ८६० पदांना मंजुरी दिल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षण अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांना नियमित क्रीडा व तंदुरुस्तीविषयी उपक्रमांचा लाभ मिळणार आहे.