Gram Panchayat
sakal
नागपूर
Gram Panchayat: ग्रामपंचायत ‘प्रशासक राज’ला तूर्त स्थगिती उच्च न्यायालय, राज्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा
Petition Challenging the Order: मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या आदेशावर तूर्त स्थगिती दिली असून, यामुळे २०२६ मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर : राज्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान संपणार आहे. निवडणूक होणाऱ्या या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तूर्त स्थगिती दिली आहे. यामुळे, ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही.

