

paper leak news Maharashtra
esakal
Maths Paper Leaked Maharashtra : राज्यातील बारावी परीक्षेला यंदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे आधीच धक्का बसलेला असताना, आता सीलबंद लिफाफ्यातूनच प्रश्नपत्रिका कमी आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विज्ञान शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये २५ ऐवजी २४ प्रती आढळल्याची तक्रार अनेक परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांनी केली आहे. या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.